सर्व देवी भक्तांना नमस्कार,
गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते म्हणजे नवरात्रीचे. आणि नवरात्र म्हटले की नऊ दिवस स्त्री शक्तीचा अखंड जागर तसेच आठवतो तो नऊ दिवस खेळला जाणार गरबा आणि दांडिया. दरवर्षी स्त्रिया नऊ दिवस त्या त्या रंगाच्या साड्या परिधान करण्यास नवरात्रीची आतुरतेने वाट बघत असतात.
परंतु यावर्षी जगावर कोरोना व्हायरसचे भयानक संकट आल्यामुळे इतर सणांप्रमाणे नवरात्रीचा सणही साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केलं आहे.
आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढायला हवा असं अनेकांनं वाटतं.परंतु किती महिलांना आपली कहाणी जगाला सांगण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होतं? अनेक स्त्रियांमध्ये कलागुणांचा अविष्कार असूनही त्यांना आपली कला, कौशल्य दाखवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होत नाही.
आणि म्हणूनच तुमच्या कलागुणांना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी, वाव देण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत महिला उद्योजकांसाठी आरंभ स्पर्धा.
'आरंभ' विषयी बोलताना कॅनव्हार्टचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आशिष म्हात्रे म्हणाले की, "ह्या स्पर्धेच्या माध्यमातून, आम्हाला महिलांमध्ये असलेली उद्योजकतेची भावना साजरी तसेच प्रोत्साहित करायची आहे आणि म्हणूनच सर्वांनी त्यांच्या या प्रवासात त्यांचे समर्थन करा. "
सदर स्पर्धा विद्यार्थीनी, गृहिणी, स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या किंवा व्यवसायात इच्छुक असणाऱ्या सर्व महिलांसाठी आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना कॅनव्हार्ट कार्यसंघाकडून शुभेच्छा.
स्पर्धा १७ ऑक्टोबर २०२० (शनिवार) पासून सुरू होईल. छायाचित्रे, व्हिडिओ पाठवणे आणि सबमिट करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२० (शनिवार) आहे.
निकाल २५ ऑक्टोबर २०२० (रविवार) रोजी www.canwhart.com ह्या संकेत स्थळावर घोषित केला जाईल.
आरंभ - महिला उद्योजकांसाठी असलेल्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खाली नमूद केलेल्या कोणत्याही पद्धतींचा वापर करुन तुम्ही स्पर्धेत भाग घेऊ शकता.
- आम्हाला आपले पूर्ण नाव, ईमेल, मोबाईल नंबर, घराचा पत्ता, व्यवसायाचे नाव, व्यवसायाची टॅगलाइन, व्यवसायाचे बोधवाक्य, व्यवसायाबद्दलचे लहान वर्णन, छायाचित्रे आणि व्हिडिओ info@canwhart.com वर ईमेल करा.
किंवा
- आपले पूर्ण नाव, ईमेल, मोबाईल नंबर, घराचा पत्ता, व्यवसायाचे नाव, व्यवसायाची टॅगलाइन, व्यवसायाचे बोधवाक्य, व्यवसायाबद्दलचे लहान वर्णन, छायाचित्रे आणि व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअँप नंबरवर (+९१ ९६६ ५००८५४७) पाठवा.
कॅनव्हार्टचे फेसबुक पेज (कॅनव्हार्ट आर्टवर्क्स) लाईक करणे आवश्यक आहे.
आपण नोंदणी केल्यानंतर आपणास आपल्या प्रवेशाची पोचपावती दिली जाईल.
टीप - सद्यपरिस्थिती पाहता आम्हाला प्रत्येक सहभागी घरास भेट देणे शक्य नाही. आम्ही आपल्या विश्वासावर आधारित ही स्पर्धा आयोजित करत आहोत. कृपया बनावट किंवा जुने फोटो किंवा आपले इतर फोटो पाठवू नयेत हि नम्र विनंती.
सहभागी होण्यासाठी आणि छायाचित्रे, व्हिडिओ सादर करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२० (शनिवार) आहे.
- संपूर्ण कला दृश्यमान आहे याची खात्री करुन ३ ते ५ छायाचित्रे काढावीत.
- आपण आम्हाला सर्व छायाचित्रे info@canwhart.com किंवा आमच्या व्हॉट्सअँप नंबरवर (+९१ ९६६ ५००८५४७) पाठवू शकता.
- आम्हाला किमान ६० सेकंद किंवा अधिक व्हिडिओ आवश्यक आहेत जे आपली संपूर्ण कला दर्शवितात. आपण आपल्या कॅमेर्याद्वारे किंवा मोबाईल कॅमेर्याद्वारे व्हिडिओ घेऊ शकता.
- आपण आम्हाला व्हिडिओ info@canwhart.com किंवा आमच्या व्हॉट्सअँप नंबरवर (+९१ ९६६ ५००८५४७) पाठवू शकता.
- जर आपण आपल्या मोबाईलवर व्हिडिओ घेणार असाल तर व्हिडिओ काढताना कृपया मोबाइल Horizontal (आडवा) पकडा . मोबाइल Vertical (उभा ) ठेवून व्हिडिओ काढू नये.
स्पर्धकाचे नाव :
स्पर्धकाचा पत्ता :
मोबाईल नंबर :
ईमेल :
व्यवसायाचे नाव :
व्यवसायाची टॅगलाइन :
व्यवसायाचे बोधवाक्य :
व्यवसायाबद्दलचे लहान वर्णन :
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल.
आम्ही बहुविध निकषांच्या आधारे बक्षीस विजेत्यांचा निर्णय घेतील आणि आमचा निर्णय अंतिम मानला जाईल.